मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
नव्या प्रतिक्रिया
- छान आहे.
6 days 7 hours ago - क्या बात
6 days 7 hours ago - छान आहे
29 weeks 1 hour ago - छान!
32 weeks 1 day ago - हृदय अजून मराठी आहे
34 weeks 2 days ago - सहजच नकळत
34 weeks 2 days ago - धन्यवाद.
44 weeks 3 days ago - छान!
45 weeks 15 hours ago - कसे फुलांचे फुलणे झाले बंद?
45 weeks 5 days ago - चुकले असावे
45 weeks 5 days ago
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- गंगाधर मुटे
- emennagot
- bigboy792
- andy776
- veta506
रक्तामासाचा सडा
******रक्तामासाचा सडा..१३ मे २००८*****
******रक्तामासाचा सडा..१३ मे २००८*****
जे जयपुर मध्ये घडले त्याने मुंबई च्या
आठवणी जाग्या झाल्या पुन्हा...पुन्हा तोच रक्तामासाचा चिखल,
पुन्हा तोच आक्रोश...पुन्हा मनात तिच चिड,तेच विचार..त्यातुन कागदावर
काही उमटले ,आपण त्याला कविता समजु हवे तर.
******रक्तामासाचा सडा******
पुन्हा आज पडला,
रक्तामासाचा सडा.
तेराव्याचे खाऊन वडे,
गळे काढून रडा.
आज जयपुर पडले,
उद्या मुंबईत घडेल.
ब्रेकिंग न्युज बघुन,
आमचे मनं रडेल.
वाहणाऱ्या रक्ताला,
पाण्याने साफ करा.
मरणारे तर मरुन गेले,
पाकडयांशी मैत्री करा.
ओसामा साल्या तू...,
गुहांमध्ये कुठे लपतोस?
पत्ता देतोस का तुझा?
सांग साल्या कुठे भेटतोस?
आय.एस.आय.च्या सरदारांनो,
सिमीच्या जिवावर उडा.
असेल तुमच्यात दम तर,
समोर येवून लढा.
रक्ताचा रंग लालच...पण,
हिरवा खुप डोक्यात चाललाय.
इथलेच खाऊन ओकणाऱ्यांनी,
देश सारा विकायला काढलाय.
भारतीयांनो तुम्ही फक्त,
शेजाऱ्यांवर प्रेम करा.
रस्त्यावरुन चालता चालता,
कधी तरी स्फोटात मरा.

छान आहे.
छान आहे.