मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- गंगाधर मुटे
- emennagot
- bigboy792
- andy776
- veta506
॥ संधी ॥
आयती चालून आलेली, सोंन्यासारखी संधी होती
हात मारला असता तर, सात पिढ्यांची चांदी होती !
अंतरींच्या आवाजाला, नको तेव्हां पालवी फुटली
तोंडून टाकूं म्हटलं तर, बुडाखालीच फांदी होती !! ॥१॥
'माय मरो मावशी जगो' म्हणणार्यांची सद्दी होती
त्यांच्या लेखी, 'द्न्यानेश्वरी न् भगवद्गीता' रद्दी होती
कधीच सांपडणार नाही, पक्के माहित होते तरी
उलट्या सुलट्या विचारांची, डोंक्यांत गुद्दागुद्दी होती !! ॥२॥
गळेकांपू संस्कृतीत, उत्कर्षाची खात्री होती
उंबर्याबाहेर तांटकळत उभी, जगद्धात्री होती !
शहाला, काटशह द्यायचाच अवकाश होता
एक टोंचणी अनामिक, सलत गात्रोगात्री होती !! ॥३॥
लोभसपणे खुणावणारी, मादक समृद्धी होती
माझ्यासारख्याकडं कुठं, समर्थांची शुद्धी होती?
कुणीतरी कुर्हाड घालून, देहाची खांडोळीं केली
कोंसळतांना कळलं, ती सदसद्विवेकबुद्धी होती !!! ॥४॥
*****************
----- रविशंकर

नव्या प्रतिक्रिया
6 days 7 hours ago
6 days 7 hours ago
29 weeks 1 hour ago
32 weeks 1 day ago
34 weeks 2 days ago
34 weeks 2 days ago
44 weeks 3 days ago
45 weeks 15 hours ago
45 weeks 5 days ago
45 weeks 5 days ago