मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)

आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)

कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्‍यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)

नव्या प्रतिक्रिया

सदस्य आगमन

नवीन सदस्य

  • 89
  • 15
  • 94
  • sheessexPes
  • GlarkarececeN

कविता कशी सुचते?

सहजच नकळत

सहजच नकळत ती कागदावर उतरत जाते.
जेव्हां सायंकाळी दोन जिवांची लपत-चपत भेट होते.......
जेव्हां रडणार्‍या चेह्र्‍याला हसवण्याची वेळ होते...........
जेव्हां मनातील शांततेला भुकंपाची चुणुक होते..........
जेव्हां............................दुर्गेश कदम

कविता कशी सुचते ?

तोंच उजळे ज्योत, कुठली अंतरीं !
प्राण, सृजनाच्या सहाय्या, धांवला !!
लेंखणीतुन रक्त, खाली ओंघळें !!!
अन् मला, हा ’शेर’ माझा, भांवला !!!! ॥३॥

*************

----- रविशंकर.
२८ डिसेंबर २००८.

कविता

बर्‍याचवेळा असं होतं की जगात वावरताना काही आवडतं, काही रुचत नाही.
मग ते व्यक्त करण्यासाठी एखाद्या योग्य माध्यमाचा शोध घेणं सुरु होतं. कधी ते सहज सुचुन जातं आणि मग त्याची कविता होते.
कधी त्यावर बरंच काही रचलं जातं...मग कधी कविता तर कधी नुसतेच लेखन तयार होते.

सस्नेह

अनामिक

या चर्चेबद्दल...

या चर्चेत सहभागी होताना 'प्रतिसाद' या विभागात लिहावे. नवीन चर्चा-विषय सुरू करू नये.
धन्यवाद!

मला वाटतं (माधवी भोसले)

मला वाटतं, कविता .... अंतरंगांतुन फुलत जाते...जगण्याचे नवे संदर्भ घेउन .....
(माधवी भोसले)

माझ्याबाबतीत

माझ्याबद्दल म्हणायचं झालं तर कवितेतल्या काही ओळी, शब्द किंवा कल्पना सहज सुचून जातात. (पण मेरी क्युरीनं म्हटल्याप्रमाणे १०% उत्स्फूर्तता आणि ९०% परिश्रम असं होतं.)

नवीन कल्पना / चपखल शब्दप्रयोग सुचायला एक विशिष्ट अवधी लागतो, तो कधी काही तासांचा असतो, तर कशी काही महिन्यांचा!

- कुमार

Syndicate

Syndicate content

सध्या कोण कोण आलेले आहे?

सध्या 0 सदस्य आणि 1 guest आलेले आहेत.

देवनागरी
Roman
लिपी बदलण्यासाठी F12 कळ दाबा.
Copyright 2009 Marathimehfil.com
Designed and maintained by Willbird.com