मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
नव्या प्रतिक्रिया
- श्री. अजबजी,
4 weeks 4 days ago - श्री. गंगाधरजी,
4 weeks 4 days ago - श्री. अजबजी,
4 weeks 4 days ago - छान आहे.
31 weeks 2 days ago - क्या बात
31 weeks 2 days ago - छान आहे
1 year 7 weeks ago - छान!
1 year 10 weeks ago - हृदय अजून मराठी आहे
1 year 12 weeks ago - सहजच नकळत
1 year 12 weeks ago - धन्यवाद.
1 year 22 weeks ago
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- 89
- 15
- 94
- sheessexPes
- GlarkarececeN
हास्यकविता
काही कविता वाचून तुमची ह.ह.पु.वा. होते का?
'हास्यकविता' या काव्यप्रकारात मोडणार्या कविता इथे प्रतिसादात लिहा. कविता (आपली नसल्यास) कोणाची आहे ते मात्र जरूर सांगा. कविता विडंबनात्मक असल्यास मूळ कविता संदर्भादाखल लिहा वा तिचा 'दुवा' द्या.
...अगदी क्षमा मागून (पण मिळण्याआधी) सुपूर्त केलीत तरी हरकत नाही!
संपादक
- संपादक यांचे लेखन
- Login or register to post comments

हास्यकविता
॥ साहेब ॥
(गझल)
यांच्यासमोर तांठ, राहूं नये कण्यानें
साधेल सर्व कांहीं, निर्लज्ज वांकण्यानें!
रे क्षुद्र कर्मचार्या!, निष्ठा करी बटीक
यांची, मिळेल बढती, यांच्याच शिंकण्यानें !
लाजूं नको, भरंवसा, यांच्यावरीच ठेंव
होईल जाड कात, यांच्याच ठोंकण्यानें
होंऊ नकोस गोरा-मोरा जनीं असा तूं
ये तेंज ओंजळीला, यांच्याच थुंकण्यानें!!
हरपेल देहभान, होईल तांठ मान
वारे पितील कान, यांच्याच फुंकण्यानें
आले कितीक, आणि गेले, किती महात्मे
होती अचाट कार्यें, यांच्याच भुंकण्यानें !!
ही चांकरीतली, घे समजून नीट मख्खी
निवृत्त होईतोंवर, 'होय जी' घोंकण्यानें
'साहेब' एक दिवशी होंशील तूं हि वेड्या
धंद्यातलें, सदैव अद्न्यान झांकण्याने !!!
***************
----- रविशंकर.
छान हजल!
हजल छानच आहे.
लाजूं नको, भरंवसा, यांच्यावरीच ठेंव
होईल जाड कात, यांच्याच ठोंकण्यानें
होंऊ नकोस गोरा-मोरा जनीं असा तूं
ये तेंज ओंजळीला, यांच्याच थुंकण्यानें!!
हरपेल देहभान, होईल तांठ मान
वारे पितील कान, यांच्याच फुंकण्यानें... हे तीन शेर विशेष वाटले.