मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)

आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)

कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्‍यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)

नव्या प्रतिक्रिया

सदस्य आगमन

नवीन सदस्य

  • 89
  • 15
  • 94
  • sheessexPes
  • GlarkarececeN

संस्कृती म्हणजे (पु.ल.)

शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी ... वांग्याचे भरीत ...गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ...
मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...दुस-याचा पाय चुकून
लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...दिव्या दिव्या दिपत्कार...
आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी...
दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे...सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य
पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा......
(पु.ल.देशपांडे)


संदर्भ

http://marathikavitaa.blogspot.com या संकेतस्थळावर ही कविता वाचनात आली.

Syndicate

Syndicate content

सध्या कोण कोण आलेले आहे?

सध्या 0 सदस्य आणि 1 guest आलेले आहेत.

देवनागरी
Roman
लिपी बदलण्यासाठी F12 कळ दाबा.
Copyright 2009 Marathimehfil.com
Designed and maintained by Willbird.com