मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- 89
- 15
- 94
- sheessexPes
- GlarkarececeN
अक्षरांच्या आत (मंगेश पाडगावकर)
अक्षरांच्या आत माझे शब्द दडलेले
आत मातीच्या जसे की बीज गढलेले...
कोणती जादू तुझ्या स्पर्शात होती
आतुनी आले फुलारुन झाड झडलेले...
तूच ना व्याख्या फुलाची एकदा केली?
ते तुला माझे पहाटे स्वप्न पडलेले...
पत्थरांना फेकणार्या सांग हातांना
देव त्यांचे पत्थरांनी त्याच घडलेले...
एकट्याने चालण्याची खंत ना प्राणां,
त्राण माझे: त्या घराशी पाय अडलेले...

नव्या प्रतिक्रिया
4 weeks 4 days ago
4 weeks 4 days ago
4 weeks 4 days ago
31 weeks 2 days ago
31 weeks 2 days ago
1 year 7 weeks ago
1 year 10 weeks ago
1 year 12 weeks ago
1 year 12 weeks ago
1 year 22 weeks ago