मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
नव्या प्रतिक्रिया
- श्री. अजबजी,
4 weeks 2 days ago - श्री. गंगाधरजी,
4 weeks 2 days ago - श्री. अजबजी,
4 weeks 2 days ago - छान आहे.
31 weeks 11 hours ago - क्या बात
31 weeks 12 hours ago - छान आहे
1 year 7 weeks ago - छान!
1 year 10 weeks ago - हृदय अजून मराठी आहे
1 year 12 weeks ago - सहजच नकळत
1 year 12 weeks ago - धन्यवाद.
1 year 22 weeks ago
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- 89
- 15
- 94
- sheessexPes
- GlarkarececeN
नववर्ष अभीष्टचिंतन! (रविशंकर)
कवी मित्रहो;
" हे अभीष्टचिंतन माझे, पहिले वहिले
फुगवितां न वास्तव, जे वाटे, ते लिहिले
ऐकला, खर्या अनुभूतीचा हुंकार
आनंद, मनाला झाला, अपरंपार
शारदा, तुम्हाला कृपादृष्टिने पाहों
ज्योती सृजनाची, अखण्ड तेंवत राहों
लेखन, तुमच्या हांतून, असेंच घडावें
भरभरून मन, शब्दांतुन ओंसंडावें " !!!
***********
----- रविशंकर.
( http://ravishankarshallofkavitaas.blogspot.com/)
१ जानेवारी २००९.
- संपादक यांचे लेखन
- Login or register to post comments

हृदय अजून मराठी आहे
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत
पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं
मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं
वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात
काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहे.