मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
नव्या प्रतिक्रिया
- श्री. अजबजी,
4 weeks 2 days ago - श्री. गंगाधरजी,
4 weeks 2 days ago - श्री. अजबजी,
4 weeks 2 days ago - छान आहे.
31 weeks 12 hours ago - क्या बात
31 weeks 12 hours ago - छान आहे
1 year 7 weeks ago - छान!
1 year 10 weeks ago - हृदय अजून मराठी आहे
1 year 12 weeks ago - सहजच नकळत
1 year 12 weeks ago - धन्यवाद.
1 year 22 weeks ago
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- 89
- 15
- 94
- sheessexPes
- GlarkarececeN
कसे फुलांचे फुलणे झाले बंद?
कसे फुलांचे फुलणे झाले बंद?
वसंत ऋतुचे सजणे झाले बंद?...
कसा चंद्रही अंधाराने व्याकुळ?
आज चांदणे पडणे झाले बंद!...
श्रावणातला पाउस येतो-जातो;
पावसातले भिजणे झाले बंद!...
वाट कुणाची कोणी पाहत नाही;
डोळे लावुन बसणे झाले बंद!...
डोळ्यांमध्ये येतच नाही पाणी
रडणे आणिक हसणे झाले बंद!...
शहरामध्ये अमाप गर्दी झाली;
मनुष्य तरिही दिसणे झाले बंद!...
जमती अड्डे मित्रांचे पण माझे-
तिथले उठणे-बसणे झाले बंद!...
स्वतःशीच मी हितगुज करतो आता
कुणास काही म्हणणे झाले बंद!...
'अजब' मनाला सुचेल ते-ते लिहितो;
'कोणासाठी' लिहिणे झाले बंद!...

कसे फुलांचे फुलणे झाले बंद?
अजबजी, सुंदर.
डोळ्यांमध्ये येतच नाही पाणी
रडणे आणिक हसणे झाले बंद!...
शहरामध्ये अमाप गर्दी झाली;
मनुष्य तरिही दिसणे झाले बंद!...
आवडले.
-----रविशंकर
मतला,हितगुज,मक्ता आवडले.
अजब,
गझल छान नीटनेटकी!
मतला,हितगुज,मक्ता आवडले.
'गर्दी'चा शेर नेहमीचा,साचेबंद वाटला.कदाचित तुझ्याच आधीच्या गझलांमध्ये येउन गेला असावा म्हणून!
जयन्ता५२