मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)

आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)

कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्‍यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)

नव्या प्रतिक्रिया

सदस्य आगमन

नवीन सदस्य

  • 89
  • 15
  • 94
  • sheessexPes
  • GlarkarececeN

॥ दीड शहाणे ॥

॥ दीड शहाणे ॥
(वक्रोक्ति)

वाहतुकीची ’ ऐशी तैशी ’
करण्यां, शोधूं नवे बहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥धृ॥

’स्कूटी-लूना-डायो’ वरती
लादुन पिशव्या-पोरें-पोतीं
रहदारीला कात्री मारित
’रॅम्बो सर्कस ’ करित वाहणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥१॥

लाल दिवा पाहतांच, गुर्मी
चढतें अंगीं, येते ऊर्मि
नियम कायदें पायीं तुडवित
सिग्नल तोंडुन, सुसांट जाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥२॥

दुकान-गल्ली च्या तोंडावर
आडवी-तिडवी लावुन ’पल्सर’
ये-जा करणार्‍यांची तिरपिट
मजेत निरखत उभें रहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥३॥

नसेल सिग्नल अपुला चालूं
फूटपाथवर गाड्या घालूं !!
चाक कुणाच्या पायांवरुनी
गेलें, तें न वळून पहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥४॥

तश्यांत मोबाईल वाजतां
मुळी न, उर्मटपणें, लाजतां
व्यस्तपणा मिरवीत, आंखडत
खांदा-डोंक्यात, ’यंत्र’ पकडत
खेंकड्यापरी गाडी हांकणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥५॥

वाहनावरीं ’जिवलग’ दिसतां
बेंछूटपणा उसळे नुसतां
चिकटत, उजव्या दुभाजकाला
करीत रहदारीचा ’काला’
दुचाक्यांस ठेंवीत समांतर
गप्पा छाटत काटूं अंतर
कोंकलोत मागचे कितीही
मुर्दाडपणे मुळी न हटणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥६॥

वांचवायला इन्धन कणभर
एकमार्गि रस्त्यांचा ’अडसर’
’रागरंग’ ’खाकि’ चा, बघावा
बेंशक, पिवळा ’फ्लॅशर’ लावा !
झणीं घुसत उजव्या अंगाला
खुशाल उलटी गाडी घाला !!
चुकून जर ’रणकन्दन’ झाले
बघून घेंइल, जों तो अपुले !
‘जबाबदारी ती सार्‍यांची
माझ्याखेंरिज‘, हे रडगाणे !!!
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥७॥

’गृहस्थ-बाया-पोरेंटारें’
कुणी न मागे, वा रे! वा रे !
’सूद्न्य’ करी, अद्न्याची नक्कल
निर्ढावत, यें नवीन ’अक्कल’
’सखाराम’ ला लावित शेंडी
करीन वाहतुकीची कोंडी !
कुणी, कुणाला जाऊं द्यावे ?
यक्षप्रश्न ! सारेच ’पेशवे’ !!!
म्हणूं, सोंसुनी घांव टांकिचें
’मी च शहाणा, मूर्ख बाकिचे’ !!!!
व्यर्थ घेंतले मुळात शिक्षण
करों आमुचे देवच रक्षण
हवी अम्हांला, ’सुरक्षीतता’
मन:पूत ’मोकांट’ वागतां !!
’विद्येच्या माहेरीं’, होते
कशी ’सोय ’ ही ? तेंच पहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥८॥
******************

----- रविशंकर.
३० डिसेंबर २००७.


छान!

पुण्यात पूर्वी लूना चालवणार्‍याला 'ल्युनॅटिक' म्हणत या कोटीची आठवण झाली. पुलंनीही पुण्यात सायकल चालवणे हे हत्यार चालवण्यासारखे आहे असे म्हटले आहे. एकंदरीत आता पुण्यात (तोंड सोडून) काहीही चालवायची सोय नाही. (तोंड चालवायला 'सवय' लागते; 'सोय' नसण्याचा पुणेकराबाबत प्रश्नच नसतो.
कवितेत अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे वा-हा-व-लो.

धन्यवाद.

श्री. अजबजी,

मजेशीर प्रतिक्रिया.

धन्यवाद.

----- रविशंकर.

Syndicate

Syndicate content

सध्या कोण कोण आलेले आहे?

सध्या 0 सदस्य आणि 1 guest आलेले आहेत.

देवनागरी
Roman
लिपी बदलण्यासाठी F12 कळ दाबा.
Copyright 2009 Marathimehfil.com
Designed and maintained by Willbird.com