मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
नव्या प्रतिक्रिया
- छान आहे.
6 days 7 hours ago - क्या बात
6 days 7 hours ago - छान आहे
29 weeks 1 hour ago - छान!
32 weeks 1 day ago - हृदय अजून मराठी आहे
34 weeks 2 days ago - सहजच नकळत
34 weeks 2 days ago - धन्यवाद.
44 weeks 3 days ago - छान!
45 weeks 15 hours ago - कसे फुलांचे फुलणे झाले बंद?
45 weeks 5 days ago - चुकले असावे
45 weeks 5 days ago
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- गंगाधर मुटे
- emennagot
- bigboy792
- andy776
- veta506
सायन्काळ
सायन्काळ
लालकेशरी किरणान्चा
सर्वत्र प्रकाश सोनेरी
बघुनी भान हरपले
निसर्गाची रम्य जादुनगरी
रविबिम्बही निघाले अस्ताला
वाराहि थबके प्रकाश प्यायला
खळाळणारे पाणी गाणे गाइ
परतूनी उषेची आतुर वाट पाही
पाने फुले नवथर वेली
मान डोलावूनी निरोप देती
प्रकाश किरणही मग हेलावती
हळूवार फुलाना अलगद कुरवाळती
उत्फ़ुल धराही आतुर आता
विलिन होण्या नीलान्गणात
सुर्यही हळूच मिटे पाकळ्या
देण्या आसमन्तास एकान्त
हळूहळू पसरती सन्ध्याछाया
हवेतही पसरे म्रुदुल गारवा
शरिरात दौडे क्शणभर शिरशिरी
अनामिक हूरहूर दाटूनी येइ मनी
गडद रन्ग उधळले प्रान्गणात
कळोखाची उमले हळूच कळी
निसर्ग मज उमगला
अनोख्या या सायन्काळी

छान आहे
छान आहे पण Type करताना जरा व्यवस्थित लक्ष देवुन
दुर्गेश