मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)

आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)

कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्‍यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)

नव्या प्रतिक्रिया

सदस्य आगमन

नवीन सदस्य

  • 89
  • 15
  • 94
  • sheessexPes
  • GlarkarececeN

कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे?

कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली...

त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात...

तिला उशीर झाला, तर ' हल्ली बसेस लेटच येतायत' म्हणून सरच तिचं स्वागत करतात...

त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर म्हणतात, '' साला लाइन मारतोय बघ!''

ती त्याच्याशी बोलली, तर फक्त विशुद्ध मैत्री...

ती रडली, तर ती म्हणेल ते खरे...

तो रडला तर म्हणतात, पोरींसारखे रडणे शोभत नाही बरे...

मुलीला अपघात झाला, तर ती इतरांची चूक...

मुलाला अपघात झाला, तर ती फक्त त्याचीच चूक...

मुलगा स्त्रियांसाठी राखीव जागेवर बसला, तर तो मॅनरलेस, असंस्कृत...

मुलगी इतर सीट्सवर बसली, तर तिचा तो हक्कच...

तिनं मुलासारखा पोशाख केला, तर तिला आधुनिक म्हणतात...

त्यानं मुलीचा पोशाख केला, तर त्याला... तुम्हाला माहितीये काय म्हणतात...!!


Syndicate

Syndicate content

सध्या कोण कोण आलेले आहे?

सध्या 0 सदस्य आणि 1 guest आलेले आहेत.

देवनागरी
Roman
लिपी बदलण्यासाठी F12 कळ दाबा.
Copyright 2009 Marathimehfil.com
Designed and maintained by Willbird.com