मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- गंगाधर मुटे
- emennagot
- bigboy792
- andy776
- veta506
सुंदर मुली………..
सुंदर मुली असतात गुलाबासारख्या
त्यांचे बाप आणि बंधू असतात काटे
काटे बोचणार हे माहिती असलं
तरी गुलाब हवा-हवासा वाटे
काळामुळे मी लहानाचा मोठा होतोय
आकाशात उडायचा प्रयत्न करतोय
तू जवळ असलीस की वाटतं उडतोय
नाहीतर वाटतं, मी उगीच धड-पडतोय
जिवनाची भातुकली, मी
चार खोलीत सावरणारा
फार बोलावंसं वाटलं तरी, मी
चार ओळीत आवरणारा
तू मला कधीच नाही आठवत
कारण आठवायला आधी विसरावं लागेल
तुझ्या आठवणी परत यायला
आधी त्यांना माझ्यापासून दूर जावं लागेल
तोंडात आणि डोळ्यात मला
फारच विरोधाभास जाणवतो
तोंड कर्तव्य म्हणून बडबडतं
शांत डोळ्यात शब्दांचा निवास जाणवतो
कुणीतरी लागतं आपल्याला
फटके मारून सुधारणारं
मग परत तोच हात
मायेने डोक्यावरून फिरवणारं

नव्या प्रतिक्रिया
6 days 7 hours ago
6 days 7 hours ago
29 weeks 1 hour ago
32 weeks 1 day ago
34 weeks 2 days ago
34 weeks 2 days ago
44 weeks 3 days ago
45 weeks 15 hours ago
45 weeks 5 days ago
45 weeks 5 days ago