मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- 89
- 15
- 94
- sheessexPes
- GlarkarececeN
कविता
अर्थबोध
॥ अर्थबोध ॥
वृत्त: ओवी
धन हेच साधन । धन ची प्रसाधन
करंटा तो निर्धन । भारत देशीं ॥ ॥१॥
पैसा ही च शक्ति । पैश्याठांयीं भक्ति
पैश्यानेच मुक्ति । मिळे येथ ॥ ॥२॥
जगायाला पैसा । भोगायला पैसा
तगायला पैसा । अनिवार्य ॥ ॥३॥
नजर धुक्याने भरून येते...
नजर धुक्याने भरून येते
तुझी आठवण भिजून येते...
तू नसताना तुझी सावली
बोटच माझे धरून येते...
शब्द बोलती बरेच काही;
मौन वेगळे कळून येते...
मनात येते मधेच वादळ
घडू नये ते घडून येते...
नकळत डोळे टिपता-टिपता
'अजब' स्वप्नही गळून येते...
पाऊस तुझा माझा
पाऊस तुझा माझा
अजून पडतो आहे
आठवणी दोघांच्या
स्मरून भिजतो आहे...
पाऊस तुझा माझा
अन भिजणार्या वाटा
तरंगणार्या लहरी
गलबलणार्या लाटा...
पाऊस एकटा नाही
सोबत झुंजे वारा
शहारणारी अंगे
की बोचरा इशारा...
पाऊस तुझा माझा
जीवन म्हणजे...
जीवन म्हणजे स्वत:स पडलेले कोडे
जीवन म्हणजे आपण शिकलेलेच धडे!
जीवन म्हणजे सोबत चालत जाणे वाट
जीवन म्हणजे नकळत हाती धरला हात
जीवन म्हणजे नव्या दिशेचा मागोवा
जीवन म्हणजे जुन्या क्षणांचा परतावा
जीवन म्हणजे रोजच एखादे धाडस
भ्रमिष्ट
एकटाच तो
बसला होता
समुद्रकाठी
खडकावरती
सायंकाळी
बुडणार्या
सूर्याला
निरखत...
सूर्यबिंब
बुडल्यावरती
कोसळला
पाण्यात;
तळाशी
असेलही तो
कुठेतरी
सूर्याला
शोधत...
किलबिल
पक्षी चार बसलेले
एका फांदीवर
दूर एकटक कोठे
लावून नजर...
वेळ सायंकाळची नि
आकाश रंगीत
पक्षी मूक का बसले
विसरून गीत?
वारा येत भरधाव
फांदीच तुटते
सारी पंगत उठते
आणि किलबिल होते...
सांभाळ स्वतःला जरा...
दुनिया रंगीबेरंगी अन रंग तुझा पांढरा!
सांभाळ स्वतःला जरा...
बहुरूप्यांच्या गर्दीमध्ये तुझा चेहरा खरा!
सांभाळ स्वतःला जरा...
इथे कुणी नाही कोणाचे
जो-तो पाहे ज्याचे-त्याचे
दुनिया 'प्रस्थापित' आणि तू
आहेस इथे उपरा...
सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर
क्रिकेट आहे धर्म आमचा 'सचिन' हा भगवान
'सचिन' ही क्रीडाजगताची अन देशाची शान
'सचिन' हे इतिहासामधले सुवर्णाक्षरी पान
किती गायले, कमीच आहे 'सचिन'चे गुणगान
जरी मिळवले अनेक त्याने गौरव अन सन्मान
शहरात या...
रान आहे माजले शहरात या
रोज वणवे पेटले शहरात या...
शहर कसले हा तुरुंगच केवढा!
माणसांना डांबले शहरात या!...
चार भिंतींना घरे म्हणतात का?
माणसांविण बंगले शहरात या...
दाखवा मज एक व्यक्ती 'सज्जन'
कोण आहे थांबले शहरात या...
सरावलो मी
सरावलो मी जीवन माझे जगायला
सरावलो मी माझे गाणे म्हणायला...
सरावलो मी कडवी सत्ये गिळायला
सरावलो मी स्वप्न तरीही बघायला ...
सरावलो मी खोटे-खोटे ह्सायला
सरावलो मी लपून डोळे पुसायला...
सरावलो मी फुलता-फुलता मिटायला

नव्या प्रतिक्रिया
4 weeks 2 days ago
4 weeks 2 days ago
4 weeks 2 days ago
31 weeks 11 hours ago
31 weeks 11 hours ago
1 year 7 weeks ago
1 year 10 weeks ago
1 year 12 weeks ago
1 year 12 weeks ago
1 year 22 weeks ago