मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)

आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)

कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्‍यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)

नव्या प्रतिक्रिया

सदस्य आगमन

नवीन सदस्य

  • 89
  • 15
  • 94
  • sheessexPes
  • GlarkarececeN

आठवणीतल्या कविता

भुतकालाची पाने

एकटाच बसला होता करुन रडवेला चेहरा
वाटत होते त्याला कुणी नाही सोबतीला
उघडून बघ तू भूतकालाची पाने
त्यात तुला भेटेल आठवानिचे गाने
आठव ते सुंदर क्षण जे होते ठेवले जपून
मनाच्या कुठल्या तरी कोपर्यात आहे ज्याचे घरकुल


शाळा

शाळा म्हटली की
नुसती आठवणींची गर्दी होते

ते धावत जाण
धावता धावता सरांवर आपटण…

आठवत आपण एकदा बेल वाजवलेली
मग प्राचार्यांनी आपल्या कानाखाली काढलेली
नंतर मग कान पकडून “ती” गम्मत सांगीतलेली


अक्षरांच्या आत (मंगेश पाडगावकर)

अक्षरांच्या आत माझे शब्द दडलेले
आत मातीच्या जसे की बीज गढलेले...
कोणती जादू तुझ्या स्पर्शात होती
आतुनी आले फुलारुन झाड झडलेले...
तूच ना व्याख्या फुलाची एकदा केली?
ते तुला माझे पहाटे स्वप्न पडलेले...


संस्कृती म्हणजे (पु.ल.)

शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी ... वांग्याचे भरीत ...गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ...


वाट पाहणे येते (सुधीर मोघे)

तीराला असतो
पाण्याचा आधार
लाटांत विरघळे
जडभारी संसार
आटते नदी अन पात्र कोरडे होते
तीराच्या नशिबी
वाट पाहणे येते...
(सुधीर मोघे)


मी कशाला गीत गाऊ? (बा. भ. बोरकर)

मी कशाला गीत गाऊ, कोण आहे ऐकणारा?
मी कशाला दीप लावू, कोण आहे जागणारा?...
मी कशाला गस्त घालू रात्रिचे हेरीत धोके?
धावणारा कोण आहे ऐकुनी माझा इशारा?...
आंबली सारीच वल्ही, थांबल्या सार्‍याच होड्या
आंधळी सारी सुकाणी, दाखवू कोणास तारा?...


शेतीची साधने (बहिणाबाई)

सरत सरत
करे पेरत पेरत...
मोघडा मोघडा
पेरनीचा चवघडा...
पांभर पांभर
मांघे धारये झांबर...
कोयप कोयप
निंदाईले सोप सोप...
आऊत आऊत
आला कमाइले ऊत...
तीफन तीफन
व्हये शेताचं मापन...
चाहूर चाहूर
आता सरलं काहूर...
वजखर वखर
घाले मायेची पाखर...


क्षण (केशवसुत)

गडबड-घाई जगात चाले
आळस डुलक्या देतो कोण
गंभीरपणे घड्याळ बोले
आला क्षण गेला क्षण...(केशवसुत)

ही कविता पूर्ण आठवत असल्यास प्रतिसादात लिहावी.


कोडे (कुसुमाग्रज)

बसलो असता निवांत रात्री
टकटक झाली दारावरती
दार उघडता आत सरकली
कोणी व्यक्ती...
बारिकतेने
बघता कळले
हुबेहूब ती
प्रतिमा माझी
दुसरी होती...
घाबरलो मी, चाचरलो मी,
पुसले त्याला- कोण, कशाला?
स्मित संभावित करुन म्हणे तो-
पिशाच्च मी तव!


Syndicate

Syndicate content

सध्या कोण कोण आलेले आहे?

सध्या 0 सदस्य आणि 1 guest आलेले आहेत.

देवनागरी
Roman
लिपी बदलण्यासाठी F12 कळ दाबा.
Copyright 2009 Marathimehfil.com
Designed and maintained by Willbird.com